MNS | बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते यांच्या पाठोपाठ मनसेकडूनही राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर निषेध व्यक्त केला जातोय.
काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत, असं मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) म्हणालेत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे.
दरम्यान मनसे (MNS) कार्यकर्त्यांना चिखलीतच अडवण्यासाठी बुलाढाणा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. चिखली ते शेगाव या मार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस तैनात आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात पप्पू हाय हाय , राहुल गांधी मुर्दाबाद, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
काय म्हणालेत राहुल गांधी?
सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Chitra Wagh | “प्यार से जोडने आये हो या नफरत फैलाने?”; चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना खोचक सवाल
- NZ vs IND 1St T20I | पावसाने घातला धुमाकूळ, सामना वॉशआऊट
- Shraddha Walkar | “…असं वाटणाऱ्या मुलींसोबतच असे प्रकार घडतात”, श्रद्धा वालकर हत्याकंड प्रकरणी ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Ashish Shelar | “ठाकरेंच्या काळात बिल्डर, बार मालकांवर…” ; आशिष शेलारांचा जोरदार निशाणा
- CAT Trailer | अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’ वेब सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज