fbpx

पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय ? ओम फट स्वाहा

औरंगाबाद : प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते, असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यानंतर आता खैरे यांच्यावर अनेकांनी निशाना साधला आहे. आज मनसेच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करत खैरेचा निषेध करण्यात आला. यावेळी पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहाच्या घोषणा देण्यात आल्या.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलन करत समाचार घेतला. मनसे कार्यकर्त्यांनी क्रांती चौकातील सिग्नलवर निषेध म्हणून भस्माच्या पुड्या वाटल्या आहेत. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना भस्माची पुडी देत आजारी पडल्यावर ती लावण्याचा उपरोधिक सल्ला मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

दरम्यान, खासदार चंद्रकांत खैरे यांची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे. फेसबुक, व्ह़ॉट्सअपवर पुडीवाले, नाडीवाले बाबा असं म्हणत अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका केली