राज ठाकरेंच्या सभेनंतर वसईत गुजराती पाट्यांच्या विरोधात मनसे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात वसई येथील जाहीर सभेने झाली. या संपूर्ण दौऱ्यात एकमेव जाहीर सभा असणाऱ्या वसईच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्दवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला.

“बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि 1960 साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे.” अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

bagdure

त्यामुळे, वसईत गुजराती पाट्यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या ढाब्यांच्या गुजराती भाषेत असलेल्या पाट्या मनसेनं काढायला लावल्या आहेत.

या मार्गावरील काठीयावाडी धाबा मालकानं गुजराती भाषेत भला मोठा बोर्ड लावला होता. याआधीही मनसेनं गुजराती पाट्या काढायला लावल्या होत्या. मात्र, या ढाबा मालकांनी पुन्हा गुजराती पाट्या लावल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

You might also like
Comments
Loading...