ऐकावे ते नवलचं! मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येवून ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे.

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या १९ तारखेला नाशिकता दाखल होणार आहे. महाजनादेश यात्रेचा समारोप येथे होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मोठी सभा घेण्यात येणार आहे. दरम्यान नाशकात महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र या पोस्टरबाजीचा मनसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकत्यांनी या पोस्टरची आरती करत याचा निशेष केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे. दरम्यान राज्यातील ज्या ठिकाणी ही यात्रा जाते तिथे प्रचंड पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पोस्टरबाजी करु नये असे सांगितले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेशानंतर देखील नाशिकमध्ये होणाऱ्या जनादेशयात्रेच्या समारोपासाठी शहरात प्रचंड फलकबाजी करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून मनसेनं अभिनव पद्धतीने आंदोलन करत या होर्डिंगची आरती केली. शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी प्रचंड असी  पोस्टारबाजी केली आहे.

दरम्यान महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. या बॅनरबाजीच्या विरोधात नाशिक महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तब्बल ७५ विना परवाना होर्डिंग हटवले असून महापालिकेने तीन जणांवर गंभीर गुन्हे देखील दाखल केले आहेत. याशिवाय आणखीन चार जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये नामांकित नगरसेवकांचे देखील नावे आहेत. त्यामुळे सध्या बॅनरच्या कारवाईमुळे नाशिकमधील वातावरण तापले आहे.