मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी साहित्यिकांना फटकारले

एका दिवसाचे साहित्य संमेलन भरवून काहीच उपयोग नाही

सांगली : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील साहित्यिकांचा चांगलाच समाचार घेतला. ते औदुंबर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलत होते. राज्यात आतापर्यंत प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठाम भूमिका घेताना दिसत होते. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. साहित्यिक राज्यात घडत असलेल्या घटनांविषयी भूमिकाच घेताना दिसत नाहीत. आज गप्प बसलात तर भविष्यात पश्चातापाची वेळ येईल असे ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

आधी साहित्यिकांच्या लिखाणातून आपल्याला महाराष्ट्रातील परिस्थितीचे भान येत होते. मात्र, आपण त्यांचे साहित्या वाचणारच नसू तर केवळ एका दिवसाचे साहित्य संमेलन भरवून काहीच उपयोग नाही. आपल्याला इतिहासातील चुकांमधून बोधच घ्यायचा नसेल, तर अशा साहित्य संमेलनांचा फायदाच काय? राज्यातील प्रमुख शहरं आपल्या हातातून गेली तर महाराष्ट्राला काही किंमत उरणार नाही.
साहित्य संमेलनं भरवण्यापेक्षा भाषेतील साहित्य जगापर्यंत पोहोचवा. विजय तेंडुलकर , पु.ल. देशपांडे यांनी आपापल्या काळात ठामपणे भूमिका घेतल्या होत्या. यापैकी काही भूमिका या अतिरेकीही असतील पण त्यांनी भूमिका घेतली, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राजकारणाचा विचार न करता महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी परखडपणे बोलले पाहिजे. निवडणुका असतील तेव्हा आपण भले एकमेकांच्या उरावर बसू, पण त्या संपल्यानंतर एकदिलाने मराठी हितासाठी काम करुयात, हे धोरण स्वीकारा. त्यामुळे किमान आतातरी सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता आपली भूमिका मांडा.

राज्यातील साहित्यविश्वाला फटकारले.

राज ठाकरे यांनी साहित्यविश्वाला फटकारत समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. तसेच लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे . हि जबाबदारी सुद्धा आहे. मात्र आज साहित्यिक त्यांची जबाबदारी पार पडतांना दिसत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात ज्याप्रकारची षडयंत्र रचली जात आहेत किंवा अतिक्रमण सुरु आहे, त्याविरोधात राज्यातील लेखक, कवी या सर्वांनीच ठाम भूमिका घेतली पाहिजे. ही शहरं तुमची आहेत, याची जाणीव ठेवून सगळ्या राजकीय आणि जातीय भिंती पाडून टाका. महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटांचा प्रतिकार करा.

You might also like
Comments
Loading...