नऊला नाही जमले आता ‘या’ तारखेला राज ठाकरेंची तोफ धडाडणार

टीम महाराष्ट्र देशा:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांची १४ ऑक्टोबरला कसबा विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहे. या सभे संदर्भात कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजय शिंदे यांनी माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची गुरुवारी पहिली सभा होणार होती. यावेळी राज ठाकरे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र अवकाळी पावसाने राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेतचं विघ्न आणले होते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या