‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’ ; मुंबईत मनसेची पोस्टरबाजी

मुंबई : मुंबई महापालिकेतील ६ नगरसेवक शिवसेनच्या गोटात गेल्याची घटना मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसतीये. शिवसेनेच्या या खेळीला मनसेने पोस्टरबाजी करत उत्तर दिलं आहे. मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मथळा छापलेले पोस्टर्स दादर भागात लावण्यात आले आहेत.

मनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

 

You might also like
Comments
Loading...