‘खळ्ळ-खटॅक’ : मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला.

नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र, फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी