fbpx

मुक्ताफळंं म्हणावं की गटारगंगा ?, मनसेकडून साध्वी प्रज्ञासिंगच्या वक्तव्याचा समाचार

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर साध्वी यांच्या या वक्तव्याचा राजकीय आणि सामाजिक स्तरातून निषेध केला जात आहे. यावर आता मनसेने आपल्या मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन अमेय खोपकर यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अमेय खोपकर यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

मुक्ताफळंं म्हणावं की गटारगंगा ? स्वत:ला कधी साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे. आमच्या करकरेसाहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपची देशभक्ती कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आमचं सूतक संपेल, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसेच्या खोपकर यांनी दिली आहे.