Share

MNS | “आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही मनसेने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. परंतू या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं एकाचवेळीसोबत असल्यामुळे, आगामी निवडणुका नसे-भाजप-शिंदे गट युती होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच मनसे (MNS) पक्षाचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी यावर एक वक्तव्य केलं आहे.

त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी रविवारी ( 23 ऑक्टोंबर ) डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली आहे. श्रीकांत शिंदे हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. परंतू त्यांनी डोंबिवली कार्यालयाला भेट दिल्याने युतीच्या चर्चेला आणखीन उधाण आलं आहे. या सर्व प्रकरणावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले मनसे नेते राजू पाटील (MNS)

श्रीकांत शिंदे यांनी आमच्या शहराध्यक्षाच्या विनंतीला मान देत कार्यालयाला भेट दिली. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी, दुश्मन नाही आहोत. शिंदे गट आणि भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतीत. स्वतंत्र निवडणूका लढण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. मात्र, राज ठाकरे त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल, असं राजू पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics