मनसेचे खळखट्याक केवळ परप्रांतीयां विरोधात – संजय निरुपम

रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्याविरोधात  मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकची मोहीम उघडली आहे. काल मनसेकडून मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांविरोधात खळखट्याकरण्यात आल्यानंतर आता कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असून  मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.