अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,’या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : एका बाजूला मुंबईत मनसेचे अधिवेशन सुरु असताना दुसऱ्या बाजूला पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसे राम राम ठोकत थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नरेंद्र पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या पाटील यांनी अवघ्या चार महिन्यांच्या आतच नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Loading...

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, उपचारादरम्यान 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं होतं.

पुढे राज ठाकरेंनी सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हाच दोन उमेदवारही जाहीर केले होते, त्यामध्ये नरेंद्र पाटील यांचा समावेश होता. नरेंद्र पाटील यांना पक्षात घेत राज ठाकरेंनी लगोलग तिकीटही दिलं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार