पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक

पुणे : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्सच्या मॅनेजरला मारहाण केल्या प्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.

हायकोर्टानं चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांबाबत ताशेरे ओढल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसेनं पीव्हीआर थिएटरमध्ये आंदोलन केलं. पीव्हीआरमधील विक्री काऊंटरला घेराव घालत मनसेनं हे आंदोलन केलं.पाच रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयाला आणि 10 रुपयाचा वडापाव 100 रुपयाला का विकता असे प्रश्न विचारत मनसे स्टाईलनं आंदोलन केलं. यात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. पीव्हीआरमध्ये खाद्यपदार्थ विक्री काउंटरवर घेराव घालत आंदोलन केलं आणि शिवगाळही केली.

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का?