रेल्वेवरील मोर्चाकडे राजकारण म्हणून पाहणारे ‘नमो रुग्ण’ – राज ठाकरे

raj thackeray mumbai morcha

वेबटीम: एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात २३ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हि दुर्घटना झाल्यानंतर रेल्वेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मुंबईमधील रेल्वेच्या समस्यांवर उद्या मनसेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दस्तुरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मैदानात उतरणार आहेत.

चर्चगेट रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या रेल्वेच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणारे. मनसेच्या वतीने मोर्चाची जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून मनसे कार्यकर्ते लोकल रेल्वेमध्ये जात प्रवाशांना मोर्चामध्ये मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहेत. तर राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून सोशल मिडिया तसेच इतर माध्यमातून नागरिकांना आवाहन केल जात आहे. तसेच राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत नागरिकांना किती दिवस तमाशा बघणार आता बास झाल म्हणत मोर्चामध्ये येण्याच भावनिक आवाहन केल आहे. तसेच जे लोक याकडे राजकारण म्हणून पाहतात ते ‘नमो रुग्ण’ असल्याची टीका केली आहे.

मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरे यांच्या झंजावाताने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याच प्रसंगाची आठवण सध्या मनसेच्या मोर्चामुळे पुन्हा येत असल्याच बोलल जात आहे. एकूणच उद्याचा मोर्चा हा मनसेसाठी नवसंजीवनी ठरणार का हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

 

1 Comment

Click here to post a comment
Loading...