लसीकरण वाढवण्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी द्या मनसे आमदाराची मागणी

लसीकरण.

मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, सध्या राज्यात आणि देशात कोरोना लस उपलब्ध झाली असून केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

‘पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा.’ अशी मागणी ट्विट करत राजू पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या