लोकसभेचा महासंग्राम : मनसेने गाशा गुंडाळला, लढण्याआधीच तलवार म्यान

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना, आता नवी माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंची शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून लोकसभा निवडणूक मनसे लढविणार नसल्याचं म्हटलं जातं.

मोदी सरकारवर मनसे कडाडून टीका करेल. मात्र लोकसभा निवडणुकीत आम्हाला रस नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही ताकद दाखवू, अशी माहिती मनसेच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला रस असून सत्ताधारी पक्षाविरोधात लढणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीच लोकसभेसाठी आमची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे, मात्र आम्हाला एम आय एम किंवा मनसे यापैकी कोणीही नको. आमच्या मित्र पक्षाकडूनही नको असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते.