विधानसभा निवडणुकीसाठी मनसे आज भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता ?

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे.मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कोणतीही भूमिका अजून स्पष्ट केलेली नाहीये.मात्र मनसेच्या इंजिनला आज (गुरुवार) चावी मिळण्याची शक्यता आहे. आज मनसेची विधानसभा निवडणुकी संदर्भातील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मनसेकडून आज पुण्यातील कसबा, हडपसर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.या संदर्भात एका दैनिकाने वृत्त दिले आहे. मनसे जिल्ह्यात नवीन चेहेर्यांना संधी देणार अशी पण माहिती मिळत आहे. कारण इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते मनसेच्या संपर्कात असून त्यांनी मनसे नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

जिल्ह्यातील शिरूर, खडकवसाला, पुरंदरपैकी एक जागा मनसे लढणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता मनसेच्या संपर्कात असून खडकवासला मतदारसंघ जर सेनेला सुटला नाही, तर मनसेचे तयारी या नेत्याने ठेवली आहे.आज पुण्यातल्या जागा जाहीर होतील असा अंदाज आहे. नेत्यांना दोन जागांवर तयारी करायला लावली आहे.

दरम्यान, मनसेची ताकद असलेल्या प्रामुख्याने कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा या चार मतदारसंघात जोरदार लढा देण्याचे पक्षाचे नियोजन आहे. कसबा मतदारसंघातून रूपाली पाटील, हडपसरमधून वसंत मोरे, यांच्या नाव आज जाहीर होऊ शकते. मात्र, इंजिनला राज ठाकरे यांच्या आदेशाची चावी मिळाल्यानंतर आज  हे निश्चित होईल.