मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत.

माळवदे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडला रवाना झाले आहेत.

Loading...

मालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे आज (शनिवार) दुपारी 3.30च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावानं माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला.

यावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले