fbpx

उर्मिलाच्या उमेदवारीला ‘मनसे’ शुभेच्छा, मुंबईत उर्मिलाला मनसेची साथ ?

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे, मात्र मोदी – शहा जोडीला सत्तेतून दूर करण्यासाठी काम करणार असल्याचं राज यांनी जाहीर केले आहे. भाजपला विरोधाचा पवित्र घेत मनसे राष्ट्रवादी – कॉंग्रेस आघाडीला मदत करत असल्याचे दिसत आहे.

आता उत्तर मुंबईतून कॉंग्रेस उमेदवार असणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा भेटल्या आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईत उर्मिलाला मनसेची साथ मिळणार असल्याचं बोलल जात आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित उर्मिलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

शालिनी ठाकरे यांची फेसबुक पोस्ट 

प्रिय ऊर्मिला,
सस्नेह जय महाराष्ट्र !

स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस.

आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे.

महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे.

तुझ्या या नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा!

2 Comments

Click here to post a comment