कमला मिल आग प्रकरणी आयुक्तांची नार्कोटेस्ट करा – संदीप देशपांडे

SAndeep-deshpande

मुंबई: कमला मिल आगीनंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना राजकीय हस्तकक्षेप होत असल्याच सांगत कारवाई वेळी ‘ तुम्ही कमला मिलमध्ये कारवाई कशी करू शकता’ म्हणत राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काल महासभेत केला होता. त्यानंतर आता ‘कमला मिल कम्पाऊंडमधल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणणारा हा महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नेता आहे की विरोधी पक्षातला ‘भैया’ आहे ? म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खरं खोटं बाहेर येण्यासाठी मेहता यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

 

कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबाव्ह या दोन हॉटेलमध्ये आग लाग लागल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात कारवाई सुरू केली होती. मात्र या कारवाई दरम्यान राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा खुलासा आयुक्तांनीच केला आहे. दरम्यान अनधिकृत हॉटेल मालकांना पाठीशी घालण्याच काम कोणते नेते करत आहेत हे समोर येन आता महत्वाच आहे.

१४ लोकांचा बळी आगीच्या खेळामुळेच : मुंबई अग्निशमन दलाचा अहवाल
मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना लागलेली आग ही आगीच्या खेळामुळे लागल्याचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे. आगीच्या खेळामुळे ही आग लागली तर बेकायदेशीर हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं सांगण्यात येत आहे.