मुंबई : मागील काही दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था सरकारच बिघडवत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘यशवंत जाधव,पाटणकर यांच्या करामती मातोश्री पर्यंत पोहचत असल्याचे दिसत असताना भोंग्याबद्दल घेतलेल्या भुमिकेबद्दल मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. अनधिकृत भोंगे उतरवायचे सोडून पद्धतशीरपणे लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आटापीटा केला जात आहे.कायदा सुव्यवस्था सरकारच बिघडवत आहे’, असे पाटील म्हणाले.
यशवंत जाधव,पाटणकर यांच्या करामती मातोश्री पर्यंत पोहचत असल्याचे दिसत असताना भोंग्याबद्दल घेतलेल्या भुमिकेबद्दल मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. अनधिकृत भोंगे उतरवायचे सोडून पद्धतशीरपणे लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आटापीटा केला जात आहे.कायदा सुव्यवस्था सरकारच बिघडवत आहे.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 3, 2022
दरम्यान, २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं हे वॉरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नेपाळच्या पबमधील नाईटपार्टीत राहुल गांधी? भाजपची टीका!
- “बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा टोला
- “…नाहीतर आम्हीही त्याच मैदानावर सभा घेऊ”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- World Junior Weightlifting Championship : पुण्याच्या हर्षदा गरुडने ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले सुवर्णपदक
- IPL 2022 : विराट इज ऑन नॅशनल ड्युटी..! आयपीएल सुरू असताना करतोय ‘या’ गोष्टीची जय्यत तयारी; VIDEO व्हायरल!