Share

MNS | “कोश्यारी नावाचं पार्सल…”; भगतसिंह कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत मनसे आक्रमक

MNS |  मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आहे.

यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही राज्यपाल कोश्यारींविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

“राज्यपालांनी सुधारायचं नाही, असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही. तिथं ज्ञान का पाजळता? ज्यांना नितीन गडकरी किंवा शरद पवारांचा आदर्श घ्यायचा आहे, त्यांनी तो आदर्श घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात आदर्श होते व आदर्श राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”, अशा आशयाचं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

MNS |  मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now