मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आदित्य ठाकरेंना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून सादर करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. मात्र, पक्षाने या भेटीचे वर्णन ‘धार्मिक’ असे केले आहे. ते शरयू आरतीला उपस्थित राहणार असून रामललाच्या मंदिरात पूजा करणार असल्याचे वृत्त आहे. खरे तर भाजप सोडल्यापासून शिवसेनेवर हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत अयोध्या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आजही त्यासाठी हिंदुत्व महत्त्वाचे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, शिवसेनेवर मनसेकडून टीका होत आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. “मुँह में राम … बगल में निजाम … “, असे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.
मुँह में राम … बगल में निजाम … l #अयोध्यावारी
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 15, 2022
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. “आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती. तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील फक्त राज ठाकरे तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यात फरक आहे”, असे संदिप देशपांडे म्हणाले.
दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका
दिपाली सय्यद म्हणाल्या, “वंदनीय बाळासाहेबांची हिंदुत्वाची परंपरा आदित्य ठाकरे यांनी कायम राखली. नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा?”
महत्वाच्या बातम्या :