Share

Gajanan Kale | “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर…”; राऊतांचा उल्लेख करत मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल 

Gajanan Kale | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.

अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वारंवार परखड भूमिका मांडत असल्याने कन्नड रक्षण वेदिकेकडून मला धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांच्या या वक्तव्यावर बोचरी टीका केली आहे.

“सौ दाऊद ज्यांना घाबरतात, त्यांना धमकी आल्याचं कळतंय. काळजी नका करू. सरकार संरक्षण देईलच. पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील”, असा टोला गजानन काळे (Gajanan Kale) यांनी लगावला आहे.

संजय राऊतांना खरच धमकी आली आहे की नाही, अशी शंका गजानन काळे यांनी उपस्थित केलीय. “चर्चेत राहण्यासाठी अशा काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली आहे का हे सरकारने पहावे”, अशी मागणी काळेंनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Gajanan Kale | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics