मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.
मात्र, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर राज्यभरातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यामुळे आता यात बदल केला जावा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेवर लादलेल्या लॉकडाऊनचा कडाडून विरोध केला आहे.
आम्ही आधीच सांगितलं होतं की अर्थचक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर सर्वसामान्यांमध्ये भडका उडेल याचा काल प्रत्यय काल राज्यभरात पाहिला मिळालं. सरकारने मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली आहे आणि प्रत्यक्षात लॉकडाऊन लावला गेला आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
सरकारने छोट्या उत्पादकांना उत्पादन करण्याची परवानगी दिली परंतु ते माल विकू शकणार नाही कारणं दुकानं बंद आहेत. दंडुकेशाहीच्या जोरावर लोकशाही जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा. अन्यथा काही दिवसांत जनतेचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहिला मिळेल. सरकारने पुढील काही दिवसांत निर्णय घ्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सरकारच्या भूमिकेवर आपली पुढील भूमिका जाहीर करेल. अस देशपांडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा धोका वाढला : हायकोर्टाने दणका दिल्यानंतर गुजरातच्या २० शहरांत नाईट कर्फ्यू लागू
- पृथ्वी शॉ कडून पाँटिंगची प्रशंसा; ‘चक दे’ मधील शाहरुखशी केली तुलना
- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अरविंद केजरीवाल सरकारने उचलली ‘ही’ पावलं
- कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक, देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्वाचे !
- वादग्रस्त वक्तव्यनंतर उदयनिधी स्टॅलिन यांना निवडणूक आयोगाची नोटीस