मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या गाडीला अपघात

manse bala nandgawkar

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बाळा नांदगावकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हाला कळवण ग्रामीण पोलीस जीपची धडक बसली.

याबात  मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात किरकोळ स्वरुपाचा असल्याचे सांगितले जात आहे. नांदगावकर यांच्या गाडीला बसलेल्या या धडकेत इनोव्हाच्या मागील बंपरची ड्रायव्हर साईड तुटली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.