कर नाही तर डर कशाला, हे राजकारण जास्त दिवस टिकणार नाही – नांदगावकर

manse bala nandgawkar

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या विरोधात बोलतो त्याला संपवून टाकायचं, त्यांच्यामागे लावात धुळीत मिसळवण्याचा प्रयत्न करायचा हे पूर्वी कोणत्याही सरकारमध्ये झाले नाही, असं राजकारण फार काळ टिकत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. यावर नांदगावकर बोलत होते.

लोकशाही मार्गाने ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली, मनसे देखील लोकशाही मार्गानेच सामोर जाईल. कार्यकर्त्यांचं साहेबांवर प्रेम असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे, मात्र सर्वांनी संयम बाळगून शांत रहावं, असं बाळा नांदगाकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सूनही ईडीच्या कार्यालयात

राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी कृष्णकुंजवरून रवाना झाले आहेत, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे हे देखील ईडी ऑफिसला जाणार आहेत. दरम्यान दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर प्रमुख रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या