मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर अपघात टळला असता

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीसंदर्भात असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी,अशी तक्रार अनेक वेळा मनसेकडून महानरपालिकेला करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे मनसेचे स्थानिक नेते मंगेश कशाळकर यांनी सांगितले. तसेच या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर हा अपघात झाला नसता,असेही ते म्हणाले.

लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये काल आग लागली आणि यात हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झाले. मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी १० ऑक्टोबर २०१७ रोजी कमला मिल्स कंपाऊंडसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती.मात्र, उत्तर मिळत नसल्याने त्यांनी कळल्यावर दोन वेळा पाठपुरावा केला.

You might also like
Comments
Loading...