पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

indorikar majaraj

अहमदनगर – पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांना जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.

दरम्यान, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदोरीकर महाराज यांची भेट झाली. इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांनी बंद दाराआड अर्धातास चर्चा केली.

या भेटीनंतर अभिजीत पानसे म्हणाले, ‘एखाद्या छोट्या, अनावधाने केलेल्या वाक्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. त्यांनी माफीही मागितली आहे. इंदोरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे. शाळा चालवत आहेत, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालणार का? पक्ष, राजकारण यापलिकडे आपण पाहायला हवं’. आज सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले.

या प्रकरणात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केलाय. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य महिलांसाठी अन्यायकारक आणि कायद्याविरोधात असल्याने तक्रार दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गु्न्हे दाखल होऊ नये म्हणून यापूर्वी अनेक राजकारणी पुढे आले होते.मात्र तरीही  गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैभव पिचड यांनी रस्त्यावर येण्याची तयारी केली आहे. एव्हढेच नव्हे, वारकरी आंदोलन करतील आणि आपण त्यात अग्रभागी राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा

‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’

‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’