मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा धागा पकडत मनसेची सेनेवर बोचरी टीका; वाघ आहे का बेडूक… ?

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएबाबत सकारात्मक संकेत दिले.

याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ट्विट करत संदीप देशपांडे म्हणतात, ‘लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध, पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक…..? असा खोचक सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Loading...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएबाबत सकारात्मक संकेत दिल्यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री मनिष तिवारी यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा,’ असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला.

दरम्यान, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती कायदा -2003 ची माहिती घेणे आवश्यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसंच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवं, कारण धर्म हा नागरिकत्वचा आधार असू शकत नाही”, असं मनिष तिवारी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती