राज ठाकरेंचा नादच खुळा, मनसेने धाडली ईडीला नोटीस

टीम महाराष्ट्र देशा:-कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी मनसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. काल राज ठाकरे यांची ईडीने ९ तास चौकशी केली. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसे शांत बसणारी नव्हती. आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे.महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला पाहिजेत अशी तक्रार मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.ईडीला नोटीस पाठवल्याची माहिती मनसेने ट्विटरद्वारे दिली.

मनसेने ईडीला नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आत्ता नोटीस पाठवणाऱ्या ईडी कार्यालयावर मराठीत अंमलबजावणी संचालनालय ही अक्षरे झळकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय आणि त्याखाली इंग्रजीमध्ये Enforcement Directorate असे नाव लिहिलेले आहे.दरम्यान याआधी ही मनसेने दुकानांवरील पाट्या मराठीत पाहिजे अशी मागणी या आधी पण केली आहे.

Loading...

कोहिनूरप्रकरणी नऊ तास चौकशी
राज ठाकरे यांची काल सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली चौकशी रात्री 8.30 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरे रात्री कार्यकर्त्यांसमोर प्रतिक्रिया दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट