दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मनसे आक्रमक,मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

mns pune

वाशीम : राज्यातील शेतकरी सततच्या दुष्काळामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. शिवाय शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांच्या दुग्धव्यवसायावरही परिणाम झाला आहे. अशात दुधाच्या दरचे संकट शेतकऱ्यासमोर उभे ठाकल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली आहे. या संकटांतून वाचविण्यासाठी राज्यसरकारने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी वाशीम येथील महारष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेनेने केली असून, या संदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागणी पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलने दूध आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही वाशीमकर मनसैनिकांनी दिला आहे.

शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधाला २७.५० रुपयांचा दर तर म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक आहे. पण खासगी सहकारी व शासकीय दूध संघांनी दूधाच दरात १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पशु खाद्याचे दर गगनाला भिडले असून, अनेकदा दुधाचे पैसे मिळविण्यासाठी दुधसंघाकडे पायपीट करावी लागते आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत दुध उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातर्फे ( महानंद ) दूध खरेदी योजना सुरू केली होती. परंतु आता ६ कोटी लिटरची मर्यादा संपल्याचे कारण देत ही योजना बंद करण्याचा निर्णय ‘महानंद’ने घेतला आहे. त्यामुळे दूध दर आणखी घसण्याची शक्यता आहे.

खरे पाहता पिशवी बंद दूध व दुधाचे उपपदार्थ विक्री करणाऱ्या दूध संघांनी दर कमी करणे चुकीचे आहे कारण पिशवीचे दर अद्यापही कमी झालेले नाही. आजही गायीच्या पिशवी बंद दुधाची विक्री ४० ते ४५ रुपये लिटरने होत असून, म्हशीच्या पिशवी बंद दुधाची विक्री ५० ते ५८ रुपये लिटर अशी होते. अर्थात दुध विक्रेत्यांचा नफा अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे सरकाने तत्काळ दूध उत्पादकांना लिटर मागे १० रुपये अनुदान तातडीने द्यावे असे आवाहन मनसेने केले आहे.

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

‘दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली’

IMP