सीएए आणि एनआरसी’च्या समर्थनार्थ मनसेत मतमतांतर

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महा अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. सीएए आणि एनआरसी च्या समर्थनार्थ येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत मनसे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मात्र राज यांच्या या भूमिकेवरून आता मनसेत फुट पडल्याचे चित्र दिसत आहे.

राज ठाकरे यांनी काल (ता. २७)  रंगशारदामध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावाली होती. मात्र केवळ १० मिनिटात कोणतीहि चर्चा न करता ते तेथून निघून गेले. मनसे नेत्यांना पुढील सूचना देण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या आहेत.

Loading...

परंतु  मनसेच्या नेत्यांमध्येच मतभेद असल्यामुळे राज ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आज (ता. २८) ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सकाळी 10 वाजता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच ही बैठक असून पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्याचीही शक्यता आहे.

मनसेच्या भूमिकेवरुन पक्षातील काही नेत्यांनीच राज ठाकरेंना प्रश्न विचारले असल्याची चर्चा आहे. मनसेची नेमकी भूमिका काय? मनसे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देऊन भाजपसोबत जाणार का? विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेवरुन यूटर्न घ्यायचा का? असे काही प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचं म्हटलं जातं.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'