सरकारमधील नेत्यांनी आपल्या कष्टाचे पैसे नुकसानभरपाईसाठी द्यावेत-मनसे

तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीचा सामान्य जनतेला भुर्दंड?; 'महाराष्ट्र बंद'मुळे झालेलं आर्थिक नुकसान सोसणार - रावते

टीम महाराष्ट्र देशा- भीमा कोरेगाव हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये गेल्या ३ दिवसांत महाराष्ट्र बंद दरम्यान एसटीचं एकूण २० कोटींचं नुकसान झालं. मात्र ही भरपाई आंदोलकांकडून नुकसान भरपाई घेणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली . रावते यांचा हा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे. रावते यांनी हे पैसे स्वतःच्या खिशातून द्यावे अशी मागणी पुणे मनसे महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

st-todfod-1

bagdure

भीमा कोरेगाव हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये गेल्या ३ दिवसांत एसटीचं एकूण २० कोटींचं नुकसान झालं. मात्र ही भरपाई आंदोलकांकडून नुकसान भरपाई घेणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिलीय. तोडफोडीत एसटी बसेसचं १ कोटींचं नुकसान झालंय, तर १९ कोटींचा महसूल बुडालाय. मात्र हे नुकसान एसटी महामंडळ सोसणार असल्याचं रावतेंनी म्हटलंय.

रावते यांनी घेतलेल्या या भूमिकेवर मनसेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ज्यावेळी मनसेकडून समाजोपयोगी आंदोलन केले जाते त्यावेळी जर काही नुकसान झाले तर मनसे कडून नुकसानभरपाई वसूल केली जाते तर मग इतरांना हाच न्याय का लावला जात नाही. वास्तविक पाहता जनतेशी सरकारने संवाद साधला असता तर हि वेळच आली नसती त्यामुळे जनतेच्या खिशातून नुकसान भरपाई देण्यापेक्षा संवाद साधण्यात अपयशी ठरलेल्या दिवाकर रावते आणि सरकारमधील नेत्यांनी आपल्या कष्टाचे पैसे नुकसानभरपाई साठी द्यावेत असं आवाहन रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मागील १० ते १५ वर्षात जेवढी तोडफोड झाली त्याची वसुली संबंधित पक्ष-संघटनांकडून केली जावी असं म्हटलं आहे.तुमच्या राजकारणाचा सर्वसामान्यांनी भुर्दंड का सोसावा असा सवाल देखील वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...