मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर अर्धी सेनाच त्यांच्या गटात शामिल झाली आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके नेते सध्या शिवसेनेत (Shiv Sena) उरले आहेत. तर कालपासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ‘निष्ठा यात्रा’ द्वारे शक्तीप्रदर्शनास सुरुवात केली आहे. यावरूनच मनसेनी (MNS) आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे.
“नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये.”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवर करण्यात आली आहे. सोबत मनसेनी शिल्लकसेना हा हॅशटॅगही वापरला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या अनेक आमदार नंतर आता नगरसेवकही शिंदे गटात शामिल होताना दिसून येत आहे. तर कालच शिवसेना भवनातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “याच भाजपच्या लोकांनी शिवसेनेवर विकृत भाषेचा वापर केला, अनेक अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे शिवसेना आणि मातोश्री विषयी प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला.
महत्वाच्या बातम्या:
- Malaika Arora : व्हिडीओ मलायकाचा, पण नेटकऱ्यांचे लक्ष वेधले मागच्या काकांनी ; पाहा VIDEO
- Shalini Thackeray : “शिवसेनेची ‘निष्ठा यात्रा’ एक बहाना…”, शालिनी ठाकरेंची खोचक टीका
- Sanjay Raut : “…त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली”, संजय राऊतांचा टोला
- Shiv Sena : मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळणार?; ‘शिवसेने’चा नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना सवाल
- Narayan Rane : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा उभी…”, नारायण राणेंची जहरी टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<