टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलाची कामे काढली जातात : मनसे 

raju patil

कल्याण – कल्याण डोंबिवलीकरांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचल असून गर्डर लाँचिंगचं पहिल्या टप्प्यातील काम काल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आलं. विंच केबल पुश थ्रू पद्धतीने महाकाय गर्डर काल 40 मीटर पर्यंत पुढे ढकलण्यात आला. आज तो आणखी 36 मीटर सरकवला जाईल. गेल्या २ वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रिपुल पूर्ण करून वाहतूक कोंडी फुटणार नसून पुलाला जोडणाऱ्या समांतर रोड जवळील जागा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकारी आणि माजी महापौर राहिलेल्या व्यक्तीने बळकावली असून मागील ६ महिन्यापासून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाची असलेली ही जागा ताब्यात घेण्यासठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत मात्र आद्यपी कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप मनसेने केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या कामाची ही पद्धतच आहे पैसे खाण्यासाठी निविदा काढायच्या आणि कामे रखडवायची , वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते याबाबत त्यांना काहीही पडलेली नसून नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप आमदार राजू पाटील यांनी केला.

महत्वाच्या बातम्या