सरकारकडे शाळांना देण्यासाठी पैसा नाही मात्र जिओ विद्यापीठाला देण्यासाठी आहे : मनसे 

पुणे : सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केले.या वक्तव्यामुळे काल दिवसभर जावडेकर यांच्यावर चौफेर टीका झाली. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पत्रक काढून जावडेकरांचा निषेध केला आहे. या सरकारकडे शाळांना देण्यासाठी पैसा नाही मात्र अस्तित्वात नसलेल्या जिओ विद्यापीठाला शेकडो कोटीची खेरात करायला मात्र पैसे आहेत असं या पत्रकात म्हटलं आहे.

मनसेने काल काढलेले पत्रक 

शाळांनी कटोरा हातात घेऊन सरकारकडे भिका मागू नये ……… अशा स्वरूपाचं वक्तव्य मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी काल पुण्यात एक शाळेच्या कार्यक्रमात केलं… हि शाळा होती ज्ञानप्रबोधीनी

अत्यन्त वाईट भाषेत जावडेकरांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या समस्त मंडळींचा अपमान केला आहे. सरकारची हुकूमशाही  मनोवृत्ती या वक्तव्यातुन दिसून येते या नालायकाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

 या सरकारकडे शाळांना देण्या साठी पेसा नाही मात्र अस्तित्वात नसलेल्या जिओ विद्यापीठाला शेकडो कोटीची खेरात करायला मात्र पैसे आहेत शाळांना कोणतीही अनुदान देण्या साठी पैसे नाही साध्य कोणत्याच अनुदानाची परिपूर्ती शाषनाकढून होत नाही वेतनेतर अनुदान बंदच आहे २५ % ची फी शासना कडून शाळांना मिळत नाही सरकार दरबारी पैसे मागायला गेल्यावर ज्या ऑफर केल्या जातात त्या ऐकल्यावर शाळा परत सरकार कडे जातच नाही अशी परिस्थिती आहे  मंत्री महोदय शाळा तुमच्या कडे भीक मागत नाही त्या आपल्या हक्काचे पैसे  मागत आहे . आणि तुम्ही उपकार करत नाही तुमच्या खिशातून पैसे देता का ? जनतेच्या कराचा पैसा आहे.आणि शिक्षण हि मूलभूत गरज आहे त्या साठी निधी उभा करणं हे सरकारच कर्तव्य आहे .

जावडेकर हि भाजपा-सेने  ची प्रवृत्ती आहे आणि सातत्याने हि प्रवृत्ती उघड होऊ लागली आहे असो या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेने ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शाळाच्या मागे ठाम पणे उभी राहणार आहे.या संदर्भात मनसे कडून योग्य ती पावलं लवकरच उचलली जातील.शाळा च्या सर्व प्रकार च्या मागण्या साठी सरकार तयार नसेल तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे १००% कार्यरत असेल. या साठी मनसे कडून लगेचच शाळा संपर्क मोहीम सुरु केली जाईल.

  कळावे,               

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!                                               

आपला नम्र,

 अजय शिंदे (शहराध्यक्ष,मनसे)