fbpx

मनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडले आहेत. अमितच्या लग्नाची पत्रिका देताना राज ठाकरे यांनी माहिती दिली असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. भाजपकडे अमाप पैसा झाला आहे. आता शिवसेनेचे आमदार फोडायला पण कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जातेय. याच जोरावर कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार फोडत आहेत, असा आरोप अजित यांनी निफाड मध्ये केला आहे.

या अगोदरही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर नगरसेवक फोडल्याचा आरोप केला मात्र आता त्यांनी राज ठाकरेंनीचं याबाबत सांगितल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.आता यावर भाजपकडून की प्रतिक्रिया येते हेही बघावे लागणार आहे.यावेळी त्यांनी भाजप आमदार राम कदम आणि सुरेश धस यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही, परंतु दिशाभूल करायला चांगलं जमतं. या सरकारने शेतकऱ्यांना काय दिले ? इथला पालकमंत्री पण जळगाव जिल्ह्यातून आयात केला आहे. त्याला नाशिकचे प्रश्न काय कळणार? नाशिकच्या लोकांनी भाजपला मतदान केलं नव्हतं का? मग त्यांना हक्काचा पालकमंत्री का मिळाला नाही? असा सवाल अजित पवार यांनी केला.