नगरमध्ये शिवसेनेचा मनसेला जोरदार धक्का

Shivsena-vs-MNS

टीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जाधव व त्यांचे पती दत्ता जाधव यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.जाधव दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

blank

गेल्या महापालिका निवडणुकीत सुवर्णा जाधव या प्रभाग क्रमांक ’27 अ’ या जागेवर मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. सुवर्णा जाधव यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी कशी? -उद्धव ठाकरे