निरुपम म्हणतात ‘टायगरला’ सुरक्षा द्या; तर ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहू शकत नाही – नितेश

टीम महाराष्ट्र देशा: मराठी चित्रपट देवाच्या शोला मल्टीप्लेक्स मालकांनी नकार दिल्यानंतर मनसेने या वादात उडी घेत देवाला प्राईम टाईम देण्याची मागणी केली आहे. थिएटर मालकांनी देवासाठी शो न दिल्यास खळखट्याकचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. यानंतर आता या वादात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटकरत उडी घेतली आहे.

‘मराठी चित्रपटांच रक्षण होण गरजेच आहे, मात्र मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी सलमानच्या टायगरसाठी संरक्षण द्याव. अन्यथा थिएटर मालकांना बाऊन्सर्स ठेवण्याची परवानगी द्यावी’ असे ट्विट निरुपम यांनी केले आहे.

दरम्यान आमदार नितेश राणे यांनीही देवाच्या समर्थनात ट्विट करत महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर ते थिएटर्स ना कुठलाच टायगर वाचु शकणार असा इशारा राणे यांनी दिला आहे.