औरंगाबादेत मनसेचा दणका; अखेर व्हीआयपी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरूवात!

औरंगाबादेत मनसेचा दणका; अखेर व्हीआयपी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरूवात!

mns aurangabad

औरंगाबाद : दिवाळीपूर्वी व्हीआयपी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही तर, अधिकाऱ्यांच्या दालनात फटाके फोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या वतीने सातत्याने या विषयावर आंदोलन करण्यात आले होते. अखेर मनसेच्या इशाऱ्याचा परिणाम झाला असून, या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

राज्य तसेच देशातील सर्व प्रमुख मंत्री, राजकीय पुढारी किंवा अधिकारी औरंगाबादला आले असता त्यांना व्हीआयपी रस्त्यांच्या मार्गानेच जावे लागते. असे असले तरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते. या मार्गाने जाताना वाहनचालकांना ‘खतरो की खिलाडी’ खेळाची आठवण येते, असा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.

अखेर या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला तांत्रिक दृष्ट्या मोठे खड्डे बुजवण्यात येणार असून, त्या नंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र, या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होईल, या कडे देखील मनसेचे लक्ष राहणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या