राज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर !

टीम महाराष्ट्र देशा: नुकताच केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्याला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्र काढत यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशितही केलं आहे. ‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे भारतीय हज यात्रेकरू उभे आहेत असेही दाखवण्यात आले आहे. तसेच भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे, ते अनुदान काढून घेतलेत ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या. त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असेही भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...