भुजबळ छोडो अभियान राबवा – राज ठाकरे

'राज'दरबारी

नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सुरु असलेल्या भुजबळ समर्थक जोडो अभियान राबविण्याऐवजी ‘भुजबळ छोडो’ अभियान राबवा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले. नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी आज कृष्णकुंज शिवाजी पार्क या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होणारा अन्याय हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हा गेल्या दोन वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत असून भुजबळांवर होणाऱ्या अन्यायासाठी अन्याय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात असून ‘अन्याय पे चर्चेचे’ आयोजन करण्यात आले असल्याच्या आपल्या भावना समर्थकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या.

Loading...

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असून त्यांना अद्यापपर्यंत जामीन मिळायला हवा होता. यापुढे आता भुजबळ समर्थकांनी सुरु केलेले भुजबळ समर्थक जोडो अभियान राबविण्याऐवजी भुजबळ छोडो अभियान राबवावे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी सर्व भुजबळ समर्थकांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी मनसे नेते बाळा नंदगांवकर, नितिन सरदेसाई उपस्थित होते.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल