fbpx

‘राज’ कन्या उर्वशी ठाकरेचं बॉलीवूड मध्ये पदार्पण

उर्वशी ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. उर्वशी ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने उर्वशीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण होतंय. उर्वशी या चित्रपटात ऑनस्क्रीन दिसणार नाही. तर, तिने ‘जुडवा २’च्या सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे.
‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘राजकीय नेत्यांच्या मुलांचा एकंदर वावर जरा वेगळा असतो. पण, उर्वशीच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. ती खूप समंजस आहे. चित्रीकरणादरम्यान बराच काळ ती राज ठाकरे यांची मुलगी आहे, हे कोणाला ठाऊकही नव्हतं.’ किंबहुना डेव्हिड धवन यांनीही उर्वशीबाबतचं त्यांचं मत मांडलं. उर्वशी चित्रीकरणाच्यावेळी आणि या सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेईल अशी अपेक्षा त्यांनी केली नव्हती. तिच्याविषयी सांगताना धवन म्हणाले, ‘तिला मी जेव्हा पहिल्यांदाच भेटलो तेव्हा ती शूटदरम्यान इतरांशी मिसळून वागेल का, याबद्दल साशंक होतो. पण, तिने अत्यंत समर्पक वृत्तीने आपली जबाबदारी पार पाडली. ती खूपच मनमिळाऊ असून, लगेचच आमच्या टीमसोबत रूळली.