राज ठाकरेंच्या वाढदिवशी ‘मनसे’ने करून दाखवलं !

टीम महाराष्ट्र देशा : आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले आणि आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करत करत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 4 रुपये स्वस्त देण्यात येणार आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल.

राज्यभरातील अनेक ठिकाणी ही विक्री होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिनी स्वस्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.