औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं तर काय हरकत? – राज ठाकरे

औरंगाबाद : औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत.

Loading...

‘पुलवामा हल्ल्यात जे शहीद झाले, त्यांचं दुर्दैव’ जायचे ते लोक गेले. नवं सरकार स्थापन झालं,’ असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. यावेळी त्यांना पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर