उद्धव ठाकरे याचं हे गलिच्छ राजकारण कधीच विसरणार नाही:राज ठाकरे

raj thakrey

मुंबई :शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने नीच राजकारण केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे राजकारण कधीच विसरणार नाही. विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेलच, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.शिवसेनेने शुक्रवारी मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना फोडले होते. त्यानंतर या सर्व प्रकारावर राज ठाकरे काय बोलतील याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. राज यांनी स्वत:हून हे नगरसेवक पाठवले असल्याची चर्चा होती. मात्र मला जर पाठवायचे असतील तर सातही नगरसेवक पाठवले असते, असे उत्तर राज यांनी दिले.

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर कडाडून टीका केली .नगरसेवक पैशांनी विकले गेले आहेत. शिवसेनेने नीच राजकारण खेळलं आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये याविषयी राग आहे. लोकांना हे आवडलेलं नाही, त्यामुळे ही लोकं मीच पाठवली आहेत, अशा सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. पाठवायचेच असते तर मी सात पाठवले असते. एकाला तरी कशाला ठेवलं असतं, एवढं दळभद्री राजकारण मला करता येत नाही आणि कधी करणारही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेना मनसेच्या नगरसेवकांना फोडणार आहे याची कल्पना होती. त्यासाठीच एक महिना आधी या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. मात्र ज्यांनी स्वत:ला विकायचे ठरवले आहे तर त्यांच्याशी बोलून काय उपयोग, असा सवाल राज यांनी केला. शिवसेनेने पैसे टाकून नगरसेवक फोडले आहेत. प्रत्येक नगरसेवकाला पाच कोटी रुपये दिल्याचे राज यांनी सांगितले. यासाठी 30 कोटी कोठून आले असा प्रश्न देखील राज यांनी विचारला.Loading…
Loading...