Raj Thackeray | मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच्या आधी ही बैठक महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अंधेरीत राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे अंधेरीचा गेम राज ठाकरे पालटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या भेटीतील चर्चेचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अंधेरीत प्रचाराला जाणार का? मनसे उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
या भेटीची चर्चा संपत नाही तोवरच आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत अंधेरी पोटनिवडमुकीवरच चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पक्षाचा निरोप घेऊनही आशिष शेलार राज यांच्याकडे आल्याची चर्चा आहे. मात्र, या भेटीनंतरही राज ठाकरे यांनी काही स्पष्टीकरण दिलेले नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “मुख्यमंत्री राज ठाकरे…”, मनसे नेत्याचं ‘ते’ ट्विट होतय व्हायरल
- Shivsena । “संसदेत ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Aditya Thackeray | “आतापर्यंत जे राजकराण झालं त्याला पातळी होती, पण…”; आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर हल्ला
- Job Alert | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Maharashtra Rain Update | राज्यात आजही अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता