मनसेने डोंबिवलीत साजरा केला ‘फेकू दिन’ नरेंद्र मोदींना केले लक्ष

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’साजरा केला. १ एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून मानला जातो. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. डोंबिवली मनसे शहर शाखेच्या वतीने सलग दोन वर्षे हा दिवस ‘फेकू दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.

प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. मला देशाचा पंतप्रधान नको तर चौकीदार बनवा. जो काळा पैसा देशाच्या बाहेर आहे, तो देशामध्ये आणायचा आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वायदे कसे खोटे ठरले, हे या वेळी सांगण्यात आले.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या फेकू दिनामध्ये मोदी आणि फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या आश्वासनांचा यावेळी निषेध करण्यात आला.