fbpx

शिवसेनेच्या समर्थनार्थ मनसे मैदानात

शिवसेना-मनसे

टीम महाराष्ट्र देशा- एकमेकांवर वार करण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकत्र आल्याचे पहायला मिळाले.काल चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या मदतीला धावून आली. यासाठी निमित्त ठरले एक संगणक.

sena-mns

काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक महापालिकेने काढून नेला आहे. संगणक का काढून नेला याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, लवकरात लवकर हा संगणक महापालिकेतील शिवसेना कार्यालयात बसविण्यात यावा व गटनेत्याना उचित सन्मान मिळावा यासाठी आज महापौरांना मनसे शहराध्यक्षांकडून निवेदन देण्यात आले. या एका छोट्याशा कारणामुळे का होईना शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे आज पहायला मिळाले.